अर्थ : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.
उदाहरणे :
मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.
समानार्थी : इतमाम
अर्थ : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.
उदाहरणे :
आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.
समानार्थी : लवाजिमा
अर्थ : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.
उदाहरणे :
नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.
समानार्थी : लवाजिमा
लवाजमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lavaajmaa samanarthi shabd in Marathi.